माळमारुती चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित माळमारुती चषक चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आरएस वॉरियर्स संघाने युनायटेड बालाजी संघाचा 15 धावांनी पराभव करून 2 गुण मिळविले. आनंद कानूर यांना सामनावीर तर ओमकार पाटील याला इम्पॅक्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आरएस वॉरियर्स संघाने 20 षटकात 8 बाद 175 धावा केल्या. आनंद कानूरने 2 षटकार, 5 चौकारांसह 51, राहुल बजंत्रीने 4 चौकारांसह 25, भावित पुजारीने 4 चौकारांसह 24 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे जावेद मुदनूरने 24 धावात 3, अलिम माडीवालेने 29 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघाचा डाव 19.3 षटकात सर्वबाद 160 धावात आटोपला. अलिम माडीवालेने 2 षटकार व 6 चौकारांसह 41, ओमकार पाटीलने 1 षटकार, 6 चौकारांसह 56 तर रवळू पाटीलने 1 षटकार व 3 चौकारांसह 20 धावा केल्या. आरएस वॉरियर्सतर्फे शंकरने 32 धावात 3, राहुल बजंत्रीने 22 धावात 2, अनिल नाईकने 27 धावात 2 गडी बाद
केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विशाल तुक्कार, महांतेश देसाई, मन्सूर बडेभाई यांच्या हस्ते सामनावीर आनंद कानूर व इम्पॅक्ट खेळाडू ओमकार पाटील, बैलहोंगल यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत शनिवारी शेवटचे साखळी सामने खेळविण्यात येणार आहेत. जिमखाना, वॉरियर्स व सिग्नेचरचे संघ संयुक्त बरोबरीत आहेत.
या गुणतालिकेतील चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत.
क्र. | संघ | सामने | विजय | पराजय | गुण | रनरेट |
1 | युनियन जिमखाना | 4 | 3 | 1 | 6 | 2.89 |
2 | आर. एस. वॉरियर्स | 5 | 3 | 2 | 6 | 0.71 |
3 | सिग्नेचर इलेव्हन | 5 | 3 | 2 | 6 | -0.39 |
4 | बीसीसी मच्छे | 4 | 2 | 2 | 4 | -1.44 |
5 | ऍडव्होकेट इलेव्हन | 4 | 1 | 3 | 2 | -0.01 |
6 | युनायटेड बालाजी | 4 | 1 | 3 | 2 | -1.84 |