ऑक्टोबर-डिसेंबर 2021 मधील आकडेवारी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱया तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये 5.4 टक्के राहिला आहे. या तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर 4 टक्के राहिला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने (एनएसओ) सोमवारी यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 0.7 टक्के होता. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कमकुवत तुलनात्मक कामगिरीमुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर 20.1 टक्के होता. दुसऱया तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.5 टक्के होता. आता चौथ्या तिमाहीत जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि युपेन-रशिया संघर्षाचा परिणाम जीडीपीवर दिसू शकतो.
एनएसओच्या दुसऱया अग्रिम अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी वाढीचा दर 8.9 टक्के राहण्याचे भाकीत वर्तवण्यात आले होते. तर जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 9.2 टक्के राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तथापि 2020-21 मध्ये त्यात 6.6 टक्क्मयांनी घट झाली होती. दुसरीकडे, एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या 9 महिन्यांत सरकारला करातून 15.47 लाख कोटी रुपये मिळाले, तर या काळात 28.09 लाख कोटी रुपये खर्च झाले.
पूर्वीचा अंदाज 5.9 टक्के
‘एनएसओ’चा जीडीपी वाढीचा पूर्वीचा अंदाज 5.9 टक्के होता. 2021-22 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार 147.72 लाख कोटी रुपये असू शकतो. म्हणजेच 8.9 टक्के दराने वाढ दिसून येईल. 2021-21 मध्ये त्यात 6.6 टक्के घट झाली. यानुसार, सध्याच्या किमतीनुसार नाममात्र जीडीपी वाढीचा अंदाज 236.44 लाख कोटी रुपये आहे. 2020-21 मध्ये तो 198.01 लाख कोटी रुपये होता.
वित्तीय तूट 1.8 लाख कोटी
यापूर्वी, जानेवारीमध्ये वित्तीय तूट 1.8 लाख कोटी रुपये होती, जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 75,500 कोटी रुपये होती. सरकारी खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात झालेली घट वित्तीय तूट असे संबोधले जाते. एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत सरकारला करातून एकूण 15.47 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तर याच कालावधीत एकूण खर्च 28.09 लाख कोटी रुपये होता. एप्रिल ते जानेवारी या कालावधीत 8 प्रमुख उद्योगांच्या विकासदरात 11.6 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 8.6 टक्के होती.