क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
तीर्थकुंडे येथे रामलिंग देवस्थान तीर्थकुंडे संघटनातर्फे महाशिवरात्रीनिमित्त निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन गुरूवार दि. 3 मार्च रोजी रामलिंग मंदिराशेजारील कुस्ती आखाडय़ात करण्यात आले आहे.
या मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटकचा केसरी संगमेश बिरादार मठपती आखाडा वि. प्रदीप ठाकुर विष्णुपंत सावर्डेकर यांचा पठ्ठा यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बसीडोनी व शरद पवार सांगली, तिसऱया क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी व किरण जाधव, चौथ्या क्रमांकाची कुस्ती सुशांत कंग्राळी वि. सचिन खोत सांगली, पाचव्या क्रमांकाची कुस्ती रोहित पाटील कंग्राळी वि. सचिन माने कोल्हापूर, सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम जाधव कंग्राळी वि. श्रीकांत हल्याळ, सातव्या क्रमांकाची कुस्ती महादेव दऱयान्नावर ईटगी वि. सोईल शेख कोल्हापूर, आठव्या क्रमांकाची कुस्ती रूपेश कर्ले, वि. राजवर्धन राशीवडे, नवव्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडे वि. संभाजी राशीवडे यांच्यात होतील. या शिवाय लहानमोठय़ा 50 हून अधिक कुस्त्या होणार आहेत.