वार्ताहर /काकती
काकती येथील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रनिमित्त सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत महारुद्राभिषेक पूजाविधी, अभिषेक व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम भाविकांच्या उत्साहात मंगळवारी पार पडला.
पहाटे पूजाअर्चा, अभिषेक घालण्यात आला. सकाळपासून देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसर बहरला होता.
रात्री दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत नामस्मरण, जप, रात्री बारापासून एक वाजेपर्यंत महारुद्राभिषेक घालण्याचा कार्यक्रम उदयस्वामी हिरेमठ यांच्या अधिष्ठानाखाली पार पडला. यावेळी देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष सिदाप्पा गाडेकर, उपाध्यक्ष शिवाजी नरेगवी, देवस्की पंच, हक्कदार, मानकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रात्री एक वाजल्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.