ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील गोकुळपुरी येथील झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत जवळपास 60 झोपडय़ा जळून खाक झाल्या असून, 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
दिल्ली अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गोकुळपुरी भागातील झोपडपट्टीत आग लागली. घटनेची माहिती मिळताच एक वाजता दिल्ली अग्निशमन दलाच्या 13 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पहाटे चारच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत 60 झोपडय़ा या आगीत जळून खाक झाल्या होत्या. तर 7 नागरिकांचा या आगीत होरळून मृत्यू झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही.