ऑनलाईन टीम / तरुण भारत
गोवा हे राज्य देशभरात पर्यटन आणि दैनंदिन कामातुन मनोरंजनासाठी काहीशी उसंत देणारे ठिकाण म्हणुन गोव्याकडे पाहीले जाते. यातूनच शरीराचे चोचले पुरवणाऱ्या उद्योगांना अर्थाजनासाठी काहीशी पुष्ठी दिली जाण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभुमीवर सुरु असलेल्या गोवा राज्यातील सेक्स रॅकेट भांडाफोड झाला आहे.
गोव्यातील संगोल्डा गावात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती गोवा पोलीसांना मिळाली होती. या सेक्स रॅकेटचा गोवा पोलिस गुन्हा शाखेने भांडाफोड केला आहे. या कारवाईतून गोवा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका टिव्ही अभिनेत्रीसह तिन महिलांना दलालाच्या तावडीतून वाचवले आणि दलालाल अटक केली. मिळालेल्या माहिती नुसार टिव्ही अभिनेत्री आणि एक अन्य महिला विरार येथील रहिवासी आहेत.
तर तिसरी महिला ही हैदराबादला वास्तव्याला होत्या. तर पोलिसांनी हैदराबादमधील एका दलालासोबत 50 हजारांचा सौदा केला. यावेळी दलालने तीन महिलांना सादर करताच त्यांना अटक करण्यता आली. अटक करण्यात आलेल्या महिलांचे वय हे 30 ते 37 वर्षांच्या दरम्यान आहे. जगभरात प्रत्येक देशात देहविक्री प्राचीन काळापासून चालत आला आहे. आज कुठे हा व्यवसाय कायदेशीर आहे, तर कुठे बेकायदेशीर. यातून बरेच आपले पोट भरत असतात. अनेकदा देहविक्रीत अल्पवयीन मुली दिसतात. गरिबीमुळे पालक आपल्या मुली हा व्यवसाय करणा-यांना विकतात.