प्रतिनिधी /बेळगाव
महाद्वार रोडवरील अणवेकर गोल्ड ही शोरुमसुद्धा पाडव्यासाठी विशेष सज्ज झाली आहे. अणवेकर गोल्डला बेळगावसह बाहेरगावच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अल्पावधीतच ही शोरुम लोकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. या शोरुममध्ये सरकारी नोकरदारांसाठी 5 लाखांपर्यंत सोने खरेदीची सुविधा आहे. तसेच मासिक हप्ते व वर्षअखेरीस खरेदी करण्याची सुविधा आहे. पाडव्यानिमित्त बहुसंख्य ग्राहक शुद्ध नाणी खरेदी करतील, असा अंदाज संचालक मंजुनाथ अणवेकर यांनी व्यक्त केला. शोरुममध्ये सर्व दागिने 916 हॉलमार्क प्रमाणित आहेत. आपल्याकडील दागिने ग्राहक येथील टेस्टींग मशीनद्वारे तपासू शकतात. खरेदी केलेल्या दागिन्यांवर एक टक्का व्याजदराने कर्ज सुविधा आहे. त्यामुळे अणवेकर गोल्डला प्रतिसाद मिळत आहे.