वृत्तसंस्था/ कोलकाता
ब्रिटनमधील मुख्य दूरसंचार कंपनी व्होडाफोनने कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडमध्ये आपला वाटा वाढवून 47 टक्के इतका केला आहे. व्होडाफोनने आपल्या सहकारी कंपनी प्राइम मेटल्स यांच्या मार्फत ही हिस्सेदारी वाढवली असल्याचे समजते.
कंपनीकडे याआधी ही हिस्सेदारी 44.39 टक्के इतकी होती. कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. प्राइम मेटल्स लिमिटेड यांच्याकडे व्होडाफोन आयडिया लिमिटेडचा इक्विटी समभागांचा 7.61 टक्के इतका वाटा होता. व्होडाफोन कंपनीने या समभागांचा वाटा आपल्याकडे घेतला. त्यामुळे हिस्सेदारीत वाढ झाली. याआधी गुरुवारी व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाने 4 हजार 500 कोटी जमवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.