पेडणे / प्रतिनिधी
अलिखित करारानुसार संजय तुळसकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त होते. गुरुवारी सरपंचदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी संतोष मावळणकर यांचं नाव संजय तुळसकर यांनी सुचविले . त्याला अनुमोदन मंदार परब यांनी दिले. सरपंचपदासाठी एकच उमेदवारी अर्ज असल्याने संतोष मावळणकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी कृष्णा गडेकर यांनी जाहीर केले. यावेळी माजी सरपंच संजय तुळसकर पंच मंदार परब , प्रदीप कांबळी, पल्लवी परब, स्मिता बांदेकर मिळून सहा पंचदस्य उपस्थित होते.
एकूण सात पंच सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे एक पंच सदस्य प्रदीप पाडलोस्कर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर एकूण सहा पंच सदस्य या पंचायतीत आहे.
अलिखित करारानुसार सरपंचपद ठराविक मुदतीत विभागून घेण्याचे ठरल्यामुळे संजय तुळसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला दिला होता. आज झालेल्या निवडणुकीत गटविकास कार्यालयाचे अधिकारी कृष्णा गाडेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना पंचायत सचिव मुकुंद उगशेकर यांनी सहकार्य केले.