प्रतिनिधी/ सातारा
शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाने थाप टाकत शिवसेनेच्या शहर शाखेला सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
निलेश मोरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, उपनेते, सातारा सांगली संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, आमदार महेश शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे, प्रवीण पाटिल, सुमित नाईक, शहापूर तालुका संपर्क प्रमुख आकाश सावंत, दीपक चव्हाण, मंगेश जाधव, अमोल पवार, रुपेश सपकाळ आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होते. कोरोनाच्या संकटात शहरात प्रबोधन, उपचार आणि शक्य ती मदत करण्यात शिवसैनिकांनी केलेल्या कार्याची महती, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या विविध वैधकीय शिबिराने हजारो रुग्णांना झालेली मदत लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी शहरातील शिवसैनिकांना प्रोत्साहन आणि यापुढे ताकद देण्याची ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली. सध्या शहरात गेली दोन वर्षापासून शिवसेनेची ताकद वाढविण्यात शिवसेना शहर प्रमुख आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख निलेश मोरे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. प्रचंड जनसंपर्क आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर कार्यामुळे शहरात व जिह्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढताना दिसते, असेही त्यांनी सांगितले.