प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय गृहमंत्रालयाने गोव्यातील काही आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या असून काही अधिकाऱयांना गोव्यात पाठवले आहे. व्ही. कांदवेळू, संजीव अहुजा, संदीप जॅकीस यांची अंदमान निकोबार येथून गोव्यात बदली करण्यात आली आहे.
संजय गिहार, तारीक थॉमस, चोखाराम गर्ग, वंदना राव, हेमंत कुमार या गोव्यात कार्यरत असणाऱयांची गोव्यातून दिल्लीत पाठवणी करण्यात आली आहे. विवेक एच. पी. यांना गोव्यातून अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवण्यात आले आहे. बॉस्को जॉर्ज या आयपीएस अधिकाऱयास अरुणाचल प्रदेशातून पुन्हा गोव्यात आणण्यात आले आहे. ओमविर सिंग यांची चंदीगढ येथून गोव्यात बदली करण्यात आली असून परमादित्य यांना गोव्यातून पुन्हा दिल्लीत पाठवण्यात आले आहे.