कारवाईनंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया
सुमारे १० तासांपासून चाललेल्या हायव्होल्टेज नाट्यानंतर खासदार नवनीत राणा (navanit rana) आणि रवी राणा (ravi rana) यांना अटक केली आहे. खार पोलिसांच्या (khar police) या कारवाईनंतर खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस आज आमच्या घरात जबरदस्तीने घुसले आहेत. एक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी दिलेल्या नोटीशीमुळे आम्ही घराबाहेर पाऊल ठेवलं नाही. पण आज पोलीस घरात घुसले, आणि जबरदस्तीने आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं आहे.
त्यामुळे ,आला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना एक प्रश्न विचारायचा आहे, ज्या पद्धतीने संविधान, नियम कायदयाचं पालन केलं, नोटीशीनंतर घराबाहेरही आम्ही पाऊल ठेवलं नाही. तरीही आमच्यावर गुन्हा दाखल होतो, कोणता नियम, संविधान महाराष्ट्रात पाळला जात आहे.
मी पंचवीस लाख लोकांचं नेतृत्व करत आले आहे. पण या पद्धतीची गुंडशाही आम्ही कधीही महाराष्ट्रात पाहिला नाही. खासदार, आमदारांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून पोलीस स्टेशनपर्यंत नेलं जात आहे. मी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विनंती करते, तुमच्या सारखे नेते असतानाही महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीबरोबर असा व्यवहार होत आहे, आमच्या सारख्या लोकांना न्याय मिळू शकत नाही महाराष्ट्रात तर भविष्यात कोणीही न्यायासाठी लढणार नाही असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं.