तेलगू चित्रपटात करणार काम
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा एका तेलगू चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येत असून याचे दिग्दर्शन शिव निर्वाणकडून करण्यात येत आहे. समांथा आणि विजय देवरकोंडा ही जोडी यापूर्वी 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या महानती चित्रपटात दिसून आली होती.
दिग्दर्शक शिव निर्वाण यांच्यासोबतचा समांथाचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. यापूर्वी शिव निर्वाण यांच्यासोबत समांथाने मजिली चित्रपटात काम केले होते. विजय आणि समांथासोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे शिव निर्वाण यांनी ट्विटद्वारे नमूद पेले आहे. शिव यांच्या ट्विटला समांथाने रीट्विट करत एका अत्यंत खास टीमचा हिस्सा होण्यासाठी अधिक प्रतीक्षा करू शकत नसल्याचे म्हटले आहे. समांथाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत चाहत्यांनी या जोडीला मोठय़ा पडद्यावर पाहण्यासाठी फारकाळ प्रतीक्षा करू शकत नसल्याचे नमूद केले आहे.
समांथा लवकरच तमिळ रोमँटिक चित्रपट काथु वकुला रेंदु काधलमध्ये दिसून येणार आहे. विग्नेश शिवन यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपटात विजय सेतुपति आणि नयनतारा देखील आहे. तर तेलगू चित्रपट शंकुतलममध्ये देखील समांथा दिसून येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळी आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे.
याचबरोबर अभिनेत्री लवकरच ‘अरेंजमेंट ऑफ लव्ह’सोबत स्वतःच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाची सुरुवात करणार आहे. याचे दिग्दर्शन डाउटन एबेचे निर्माते फिलिप जॉन करणार आहेत.