पीसीआर पोलीस सागर पटेकर जखमी; अन्य एका पोलीसाच्या बालेनो कारगाडीचे नुकसान : संशयिताच्या कारगाडीने धारबांदोडा येथे घेतला पेट,हवेली कुर्टी ..ओपा जन्क्शन…धारबांदोडय़ात कारने घेतला पेट
प्रतिनिधी /फोंडा
दिल्लीस्थित गोव्यात दाखल झालेल्या एका युवा पर्यटकाने काल सोमवारी फोंडय़ात धुमस्टाईलने केलेल्या कारगाडीच्या थरारात दोघा पोलीस कॉन्स्टेबलना जबरदस्त नुकसानी सोसावी लागली. एका साध्या वेशातील पोलिसच्या कारगाडीची नुकसानी तर ऑन डय़ुटीवरील एका पोलीस कॉन्स्टेबलला ठोकरून त्याला हात फ्रक्चर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
ओपारोड खांडेपार जन्क्शनवर डय़ुटी बजावणाऱया एका पोलीस कॉन्स्टेबलला चारचाकीने ठोकरल्याने तो गंभीर जखमी झाला. सागर पटेकर (बक्कल नं. 6023) असे त्याचे नाव आहे. त्यानंतर पलायन करून गेलेल्या चारचाकीचा आमिगेस हॉटेल धारबांदोडा येथे स्वयंअपघातात चारचाकीने पेट घेत या थरारनाटय़ाचा समारोप झाला. सुदैवाने पोलिसांनी चारीचाकीतून त्या पर्यटक चालकाला बाहेर काढल्याने तो बचावला मात्र या थरारात डय़ुटीवरील पोलीस गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अन्य एका पोलिस कर्मचाऱयाची बालेनो कारगाडीचे नुकसान झाले. काल सर्वत्र ‘कार ऑन फायर’ चे लाईव्ह चित्रीकरण सोशल मिडीयावर झळकत होते.
मूळ दिल्लीस्थित, बंगळूर येथे कामावरून सहलीसाठी गोव्याला दाखल
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारचालक अक्षित अगरवाल नामक असून मूळ दिल्लीस्थित आहे. आपल्या टॉयोटा डीए 10 सीएल 7395 ने शनिवार 30 रोजी बंगळूरहून गोव्यात दाखल झाला होता. बंगळूर येथील एका हायर कन्सल्टन्सी आस्थापनात तो अभियंता म्हणून कामाला आहे. लागोपाठ सुटी असल्याने तो सहलीसाठी एकटाच आपली चारचाकी घेऊन गोव्यात दाखल झाला होता. कलंगुट येथे दोन दिवस एका हॉटेलात वास्तव्य केल्यानंतर तो काल सोमवारी फोंडा शहर फिरण्यासाठी आला होता.
हवेली कुर्टी.. ओपा जन्क्शन.. त्यानंतर धारबांदोडय़ात गाडीला घेतला पेट
कलंगुटहून आल्यानंतर तो फोंडय़ात फिरत असताना हवेली-कुर्टी येथील सावित्री हॉलजवळील अंडरपासच्या खाली त्याने पहिला अपघातात साध्या वेशात असलेल्य़ा हिवरे सत्तरी येथील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या बालेनो कार जीए 04 ई 2414 येथे धडक दिली. या थरारात एक पादचारी महिलाही किरकोळ जखमी झाली. घटनास्थळावरून पलायन करताना तो मोले दिशेने पलायन केल्याचे पोलीस कॉन्स्टेबलने निदर्शनास आले. तात्काळ साध्या वेशातील पोलिसांनी पोलीस स्थानकाला व चारही रोबोट कर्मचाऱयांना वायरलेस द्वारा कळविण्यात आले. हा संदेश मिळाल्यानंतर खांडेपार येथे रोबोट क्रमांक 40 (जीए 07 जी 1934 )वर कार्यरत असलेले चालक साईनाथ देसाई व कॉन्स्टेबल सागर पटेकर सतर्कता दाखवित ओपा जन्क्शनजवळ पोचले. यावेळी भरघाव वेगाने येत असलेल्या अगरवाल यांच्या चारचाकीला थांबण्याचा इशारा करीत असतानाच त्याने सागर याला ठोकरून धारबांदोडामार्गे धूम ठोकली. पुढे धारबांदोडा येथे आमिगोस हॉटेलजवळील त्याचा वाहनावरील ताबा गेला सरळ धडक झाडाला दिल्यानंतर वाहनाने पेट घेतला. त्याच्या मागावर असलेल्य़ा काही चारचाकीने या घटनेचा व्हीडीओ चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल केली आहे.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी कुर्टी व खांडेपार येथील अपघाताची नोंद केली असून कुळे पोलिसांनी धारबांदोडा येथे चारचाकीने पेट घेतलेल्य़ा अपघाताचा पंचनामा केला आहे. फोंडा पोलिसांनी संशयित अगरवाल यांच्याविरोधात डय़ुटीवरील अधिकाऱयावर ठोकरल्याप्रकरणी भा.दं.सं. 333 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तसेच कुळे पोलिसांनी भरघाव वेगाने वाहन अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित अगरवाल यांच्यावर भा. दं. सं. 279 व 338 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉन्स्टेबल सागर पटेकरचा हात फ्रक्चर डोक्याला दुखापत
दरम्यान सागर पटेकर या पोलीस कॉन्स्टेबलचा हात फ्रक्चर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉत त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी दिली असून याप्रकरणी हवालदार सिनारी व उपनिरीक्षक नारायण पिंगे अधिक तपास करीत आहे.