श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र ताजिकिस्तान असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. याचे केंद्र ताजिकिस्तानमध्ये 170 किमी खोल असल्याचे सांगितले जाते. मोठय़ा धक्क्यानंतर आणखीही काही सौम्य धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आले. यापूर्वी 18 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता.
Previous Articleमहाराष्ट्र सरकारची कोंडी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.