पुणे बाजूकडे जाणाऱया वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंतरांगा
प्रतिनिधी सातारा /
सलग सुट्टय़ा आल्यामुळे पुणे मुंबईतील चाकरमानी रविवारी सायंकाळी पुणे-मुंबईला परत फिरू लागल्याने आनेवाडी टोल नाका चांगलाच जॅम झाला होता. रात्री उशिरापर्यंत सुमारे पाच किलोमीटरपर्यत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वादवादीचे प्रकार घडत होते. वाहनांच्या रांगा आनेवाडी पुलावरून पुढे आल्या होत्या. सर्व्हिस रोडवरून वाहतूक सुरू होती. दरम्यान, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते.
सलग आलेल्या सुट्टय़ांचा आनंद घेण्यासाठी जिह्यातील चाकरमानी गावी आले होते. तसेच काही गावाच्या यात्रा असल्याने मुंबईकर गावी आले आहेत. ते रविवारी सायंकाळी पुणे-मुंबईकडे रवाना होत होते. त्यामुळे रविवारी जिह्यातील महामार्गावर वाहनांची मोठी संख्या दिसत होती. सायंकाळी महामार्गावर गर्दी होण्यास सुरुवात झाली. सायंकाळी 4 नंतर कराड तालुक्यातील वाठारपासून ते खंडाळा तालुक्यातील शिरवळपर्यत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. आनेवाडी टोल नाक्यावर सायंकाळी 5 पासूनच रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. पाच किलोमीटर पर्यतरांगा लागल्या होत्या. पुलावर व सर्व्हिस रस्त्यावर तेवढीच वाहने होती. काही वाहनधारकांनी आपली वाहने सर्व्हिस रोडने घातली होती. वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. यामुळे वाहनधारकामध्ये वादवादीचे प्रकार घडत होते. टोल कर्मचारी हे दुचाकीसाठी वेगळी लेन करून देत होते. वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत होती. टोल नाक्यावरून सुटका करण्यासाठी प्रत्येक वाहनधारकाचा प्रयत्न सुरू होता. वाहतूक पोलीस मात्र कोठे दिसत नव्हते. या गर्दीत रुग्णवाहिका, पोलीस गाडय़ा ही अडकत होत्या. अचानक एकदम वाहने बाहेर पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
सातार-पुणे महामार्ग जाम
रविवारी लग्नग्नाची मोठी तिथं होती. त्यामुळे जिह्यातील बहुतांशी ठिकाणी लग्नाचे सोहळे होते. या सोहळ्याला अनेक वाहने बाहेर पडल्याने वाहतूक कोंडी अगदी छोटय़ा छोटय़ा रस्त्यावर वाहतूकीचा प्रश्न रविवारी भेडसावत होता. महाबळेश्वर, पंचगणी येथे ही गर्दी पर्यटकानी केली होती. सायंकाळी परत प्रवाशी फिरल्याने वेळे, सुरुर, जोशी विहीर येथे वाहतूक कोंडी होत होती. महामार्ग पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
टोलनाक्यावर वाहतूक कोंडी
22केआरडी10 कराडः आशियाई महामार्गाच्या कोल्हापूर-पुणे लेनवर कराडनजीक वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
लग्नग्न तिथी आणि रविवारची सुट्टी यामुळे तासवडे टोलनाक्यावर 22 रोजी दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेकदा सलग सुट्टय़ांच्या काळात महामार्गावर वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढून त्याचा परिणाम तासवडे या.कराड येथील टोलनाक्यावर जाणवतो. अनेक वाहनधारकाचा फास्टॅगचा रिचार्ज संपलेला असतो असे वाहनधारक डबल टोलची रक्कम भरण्यावरून टोलनाक्यावर वाद घालत बसतात. त्यामुळे पाठीमागे वाहण्याच्या रांगा लागलेल्या असतात. टोलनाका व्यवस्थापनाकडून वाहतूक कोंडी निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजना केल्या जातात परंतु सुटी सणवार आणि लग्नग्नकार्यांच्या तिथी असल्यास टोलनाक्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. रविवारी 22 रोजी ही वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला.