वृत्तसंस्था/ अमलापुरम
आंध्रप्रदेशच्या अमलापुरम शहरात पोलिसांनी मंगळवारी मोठय़ा प्रमाणावर हिंसा झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी 46 जणांना अटक केली आहे. तर प्रशासनाने संबंधित क्षेत्रातील सुरक्षा वाढविली आहे. मंगळवारी झालेल्या हिंसेत एक मंत्री तसेच आमदाराचे घर पेटवून देण्यात आले होते. कोनसीमा जिल्ह्य़ाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावरून ही हिंसा भडकली होती. कोनसीमा जिल्हय़ाचे मुख्यालय असलेल्या अमलापुरमध्ये जिल्हय़ाचे नाव बदलण्यास विरोध दर्शविण्यासाठी कोनसीमा साधना समितीकडून निदर्शने आयोजित करण्यात आली होती. निदर्शकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली होती. या हिंसक निदर्शनामुळे सार्वजनिक मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते.