सीसीआयने दिली विलीनीकरणास मान्यता
नवी दिल्ली
कॉम्पिटिशन कमीशन ऑफ इंडिया(सीसीआय)यांनी एअरएशिया आणि एअर इंडिया यांच्या विलीनीकरणास मंजुरी दिली आहे. दोन्ही एअरलाईन्सवर टाटा समूहाचे नियंत्रण आहे. दोन्ही एअरलाईन्ससोबत येत ते भारतात देशांतर्गत प्रवासी बाजारात 15.7 टक्के हिस्सेदारी प्राप्त करणार आहेत. मागील काही दिवसात एअर इंडियाने एअर एशिया इंडियाच्या अधिग्रहणाकरीता व्यवहार करण्यासाठी सीसीआयकडे मंजुरीची मागणी केली होती.
एअर एशिया इंडियामधील टाटाची हिस्सेदारी
टाटा जवळ एअर एशिया इंडियामध्ये 83.67 टक्के हिस्सेदारी आहे. डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी एअर इंडियामध्ये आपली हिस्सेदारी वाढवली होती. टाटा आता शिल्लक असणारी 16 टक्के हिस्सेदारी अधिग्रहणात घेणार आहे. ही हिस्सेदारी मलेशिया एअरलाईन समूह एअर एशिया बरदाह यांच्याजवळ आहे. एअर एशिया इंडिया ब्रॅड नाव एअर एशियाच्या अंतर्गत काम करत आहे.