वृत्तसंस्था/ हॅले (जर्मनी )
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या हॅले ग्रासकोर्ट पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या हय़ुबर्ट हुरकाझने एकेरीचे विजेतेपद मिळविताना रशियाच्या टॉप सीडेड डॅनिल मेदवेदेव्हचा पराभव केला.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात पोलंडच्या हुबर्ट हुरकाझने रशियाच्या मेदवेदेव्हचा 64 मिनिटांच्या कालावधीत 6-1, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. हुरकाझच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हे पाचवे विजेतेपद असून गेल्यावर्षी त्याने विंबल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.