सलग सहावे सत्र मजबूत स्थितीत ः जागतिक पातळीवरील सकारात्मक परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
सलग सहाव्या सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात तेजीचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये ट्रेडिंग समाप्त होण्याच्या अगोदर लिलाव वाढल्याच्या कारणास्तव बुधवारी बीएसई सेन्सेक्स तेजीसह बंद झाला आहे. यामध्ये जगभरातील प्रमुख बाजारांमध्ये निर्माण झालेल्या सकारात्मक स्थितीमुळे विदेशी संस्थांकडून गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी तेजीसह बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच यांच्या समभागातील लिलाव झाल्याने शेअर बाजाराल समर्थन मिळाले असल्याचे पहावयास मिळाले. यावेळी काहीशी चढउताराची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 214.17 अंकांनी वधारुन 0.37 टक्क्यांसोबत तो 58,350.53 वर बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 42.70 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 17,388.15 वर स्थिरावला आहे. काहीवेळ सेन्सेक्स 58,415.63 इतक्या उंचीवरही पोहोचला होता.
दिग्गज कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, टायटन, एशियन पेन्ट्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नफा कमाईत राहिले होते. तर अन्य कंपन्यांपैकी मारुती सुझुकी, सनफार्मा, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत.
जगातील बाजारात आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभात राहिले असून चीनचा कम्पोजिट हे घसरणीसह बंद झाले आहेत. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.91 टक्क्यांनी घसरुन तो 99.63 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.
तसेच जागतिक पातळीवरील अन्य घडामोडींमध्ये चीन हा तैवाणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्यानचे दिसून येत असून यामुळे चीन व अमेरिका यांच्यातील तणाव वाढतच आहे. यामुळे आगामी काळात या घटनेचा शेअर बाजारांवर कसा प्रभाव होतो ते पहाणे आवश्यक असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.