बेळगावच्या कन्येने दाखविला सहृदयीपणा
प्रतिनिधी /बेळगाव
शासकीय सेवेतील एखादा अधिकारी सहृदयी असेल तर त्यांच्या हातून अनेक लोकहिताची कामे होतात. सध्या यादगिरीच्या जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या बेळगावच्या कन्येने केवळ 24 तासांत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देऊन मानवतेचे दर्शन घडविले आहे.
जिल्हाधिकारी स्नेहल आर. या चिकोडी तालुक्मयातील अंकलीच्या. यादगिरीत सध्या त्या सेवारत आहेत. त्यांच्याकडे गिरीशकुमार नामक एका तरुणाने अनुकंपा आधारावर नोकरी देण्यासाठी अर्ज दिला. अर्ज स्वीकारून केवळ 24 तासांत स्नेहल यांनी त्याला नोकरी दिली आहे.
गिरीशकुमार याची आई शुभलक्ष्मी मल्लिकार्जुन या यादगिरी तहसीलदार कार्यालयात शिपाई होत्या. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्याला कुटुंब चालविणेही कठीण झाले होते. 21 ऑगस्ट 2021 रोजी शुभलक्ष्मी यांचे निधन झाले होते. गिरीशकुमारने जिल्हाधिकारी स्नेहल यांची भेट
घेऊन चतुर्थ श्रेणी नोकरीसाठी अर्ज दिला.
स्नेहल यांनी महसूल विभागात रिक्त असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदावर गिरीशकुमार याची नियुक्ती केली. केवळ एका दिवसात त्याला नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. अनुकंपा आधारावर नोकरी देण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी दाखविलेल्या या तत्परतेचे कौतुक करण्यात येत आहे.