अधिकाऱयांकडून जागेची पाहणी : परिसराच्या विकासाला मिळणार गती
प्रतिनिधी /अथणी
तालुक्मयात विमानतळ होण्यासाठी गत अनेक वर्षांपासून राजकीय, औद्योगिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. शहराच्या जवळच असलेल्या यलहडगी येथे कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱयांनी विमानतळासाठी आवश्यक जागेची पाहणी केली. त्यामुळे तालुक्मयात विमानतळासाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
महामंडळाचे तांत्रिक सल्लागार ब्रिगेडियर डी. एम. पूर्वीमठ म्हणाले, विमानतळासाठी 150 एकर जागेची आवश्यकता आहे. पूर्व-पश्चिम दिशेला रन-वे करण्यासाठी 1000 मीटर लांब व 100 मीटर रुंद जागा पाहिजे. येथील महसूल खात्याकडून जमिनीच्या माहितीचा नकाशा महामंडळाकडे देणे आवश्यक आहे. महसूल विभागाने दिलेली माहिती सरकारकडे देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अथणीचे तहसीलदार सुरेश मुंजे, केएसआयआयडीसी योजना अभियंता अक्षय हुंडेकर, तेलसंगचे महसूल निरीक्षक एम. ए. मुजावर, यलहडगी ग्रामलेखाधिकारी जगदीश राठोड, ग्रा. पं. सदस्य गुरुदत्त कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
हालचाली गतिमान
तालुक्मयात विमानतळासाठी हालचाली वाढल्या असून पाठपुरावा सुरू आहे. लहान विमानतळ असले तरी तालुक्मयाच्या विकासासाठी त्याचा फायदा होणार आहे. येथे विमानतळ झाल्यास येथील औद्योगिक व इतर विभागांच्या विकासाला गती येणार आहे. महाराष्ट्र हद्द जवळ असल्याने विमानाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा नेत्यांचा होरा आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळावी व काम सुरू होऊन प्रत्यक्षात ते साकारावे, यासाठी आता सरकारी व राजकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.