जगभरात लठ्ठपणा आणि मधुमेह या जुळय़ा बंधूंनी हाहाकार माजविला आहे. भारतात लठ्ठपणाची समस्या कमी असली तरी मधुमेह किमान 8 ते 10 कोटी लोकांना झालेला आहे, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात. वाढलेल्या वजनाचा आणि मधुमेहाचा अनोन्य संबंध आहे. त्यामुळे मधुमेहावर उपचार होत असताना वजन नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान रुग्णाला स्वीकारावे लागते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम, खाण्यापिण्यावर बंधने व इतर पथ्ये कसोशीने पाळावी लागतात. अनेकांच्या दृष्टीने हे अडचणीचे आणि काही प्रमाणात अशक्मय असते.
मात्र, आता सेमाग्लुटाईड नामक एक इंजेक्शन शोधण्यात आले आहे. या इंजेक्शनच्या साहाय्याने वजन नियंत्रणात राहते, असे दिसून आले आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्राधिकरणाने तसेच ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स (एनआयसीई) ने या इंजेक्शनला मान्यता दिली आहे.
प्रदीर्घ काळच्या लठ्ठपणाला या इंजेक्शनमुळे हटविता येते, असे दिसून आले आहे. लठ्ठपणा कमी करणाऱया शस्त्रक्रियेपासूनही या इंजेक्शनमुळे बचाव होऊ शकतो. रुग्णाचे वजन 30 ते 40 टक्क्मयांनी कमी करण्याची क्षमता सेमाग्लुटाईड या औषधी द्रव्यात असल्याचे दिसून आले आहे.