उत्तराखंडमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट
देहरादून, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानंतर सतत भूस्खलन होत असल्याने गंगोत्री चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. गंगोत्री चारधाम यात्रेवर पुढील दोन दिवस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. चारधाम यात्रेला जाणाऱया भाविकांना काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. उत्तराखंडबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. चारधाम यात्रा मार्गासह महामार्ग बंद करण्यात आल्याने प्रवासी जागोजागी अडकले आहेत. पोलीस-प्रशासनाकडून बंद पडलेले रस्ते खुले करण्याचे काम सुरू असले तरी खराब हवामानाचा अडसर कायम आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये अनेक जिह्यांमध्ये दुसऱया दिवशी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तरकाशी, चमोली, बागेश्वर, पिथौरागढ, उधमसिंहनगर आणि हरिद्वार जिह्यांतील काही ठिकाणी दोन दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता आहे.
गंगोत्री महामार्गावर 40 तासांनंतर वाहतूक सुरळीत
उत्तरकाशी जिह्यातील पावसामुळे गेल्या 40 तासांपासून बंद असलेला गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महामार्ग खुला झाल्याने अडकलेल्या हजारो प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यासह गंगोत्री धामची यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. मुसळधार पावसामुळे गंगोत्री महामार्गावरील वाहतूक बुधवारी रात्रीपासून हेळगुगडजवळ मोठय़ा प्रमाणात ढिगारा आल्याने बंद करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी महामार्ग बंद करण्यात आला. आता हा मार्ग खुला झाला आहे.