चिंदर पडेकाप माळरानवरील घटना
Bullock seriously injured due to Gavathi bomb
चिंदर पडेकाप माळरानावर चरण्यास गेलेल्या बैलाने डुकरास ठेवण्यात आलेला गावठी बॉम्ब चावल्याने बैलाचा जबडा फुटून गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. यात बैल गंभीर जखमी झाला असून जबडा फुटला होता. याबाबत कुडोपी येथील बैलाचे मालक मनोज दत्ताराम सावंत यांनी माहिती दिली. घटनेची माहित मिळाल्यानंतर आचरा पोलीस ठाण्याचे संदीप कांबळे अभिजित बाबल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली
चिंदर कुडोपी येथील शेतकरी मनोज दत्ताराम सावंत यांनी आपली गुरे चिंदर पडेकाप माळरानावर सकाळी चारण्यास सोडली होती. दुपारी गुरे आणण्यासाठी गेल्यावर त्याना बैल जबडा फुटलेल्या अवस्थेत रक्तबंबाळ झालेला दिसून आला बैल खाली पडून वेदनेने विव्हळत होती. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लागलीच बोलवत उपचार चालू केलेत.
शेतीच्या कामाचा बैल जखमी झाल्याने परब हे व्यथित झाले होते. जखमी बैलावर डॉ. कांबळे, डॉ.परुळेकर यांनी उपचार चालू केले होते.
आचरा /प्रतिनिधी-