चौथ्या दिवशी परिसरातील लोखंड, पत्रे हटवण्याचे काम युद्धपातळीवर
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
प्रतापगडाच्या पायथ्याला अफझलखान कबर परिसरात आज सलग चौथ्या दिवशी महसूल विभाग व वन विभागाच्या संयुक्तिक कारवाईमध्ये संपूर्ण परिसरातील पाडलेल्या बांधकामांचे डबर, माती, पत्रे व लोखंड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अद्याप संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्तात काम स्gरू आहे.
अनेक वर्षे प्रलंबित असलेली कारवाई पूर्ण होत असल्याने शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ज्या चौथऱयावर अफझलखानाची कबर आहे, तेथील सुमारे चार फूट चौथरा वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने हा चौथरा तोडण्याचे काम आज युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. आज अफझलखान व सय्यद बंडा यांच्या कबरीवरील चादर व मोरपीस हटवून खऱया अर्थाने हा परिसर अतिक्रमण व उदात्तीकरण मुक्त करण्यात आला आहे. कबरीवरील मजबूत बांधकाम पाडून कबर उघडे करुन चार दिवस उलटले तरी कबरीजवळ अद्याप मोठय़ा प्रमाणात अत्तराचा घमघमाट कमी झालेला दिसत नाही. संपूर्ण परिसर कायमस्वरूपी अतिक्रमण विरहित व उदात्तीकरण होऊ नये, यासाठी शासनाने या परिसरातील सुंदर असे स्मारक, बगीचा व यांची योग्य देखभाल ठेवण्यासाठी समिती नेमावी अशी चर्चा सुरू आहे.