International Men’s Day: समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर दिला जातो. जगभरात आज हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष असे ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
काबाडकष्ट करत मुलाबाळांना घडवतो तो..
स्वतः उपाशी राहत इतरांना भरवतो तो..
हलाखीत दिवस काढत मुलांनी शिकावं यासाठी झटतो तो..
हलाखीचे दिवस काढत इतरांचे स्वप्न पूर्ण करतो तो..
आणि
गर्दीतून महिलांना सन्मानाने वाट काढून दिली तरीही गुन्हा दाखल होतो तो पुरुष
नेमके काय प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता. आव्हाडांवर नुकताच याच कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर काही वेळानं त्यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला. पण पोलिसांनी आपल्यावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला होता. गर्दीतून मार्ग काढताना तक्रारदार महिलेला आपण सहजतेनं बाजुला केलं होतं, त्यामध्ये जाणीवपूर्वक कुठलीही कृती करण्यात आलेली नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.