कडीकोयंडा तोडून दागिने, रोकड पळविली : ठसेतज्ञ, श्वानपथकाला पाचारण
प्रतिनिधी /बेळगाव
रामदेव गल्ली-पिरनवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून 3 लाख 87 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
महेश चंद्रकांत मुचंडीकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार पहिल्या मजल्यावरील घरात चोरीची ही घटना घडली आहे. कोणी नसताना कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात शिरून सुमारे 8 तोळे सोने, 5 तोळे चांदीचे दागिने, 57 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 87 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे.
शहर व ग्रामीण भागात चोऱया, घरफोडय़ा पुन्हा वाढल्या आहेत. चोरटय़ांनी बंद घरे लक्ष्य बनविली असून त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत. आठ दिवसांपूर्वीच दिवसा घरफोडय़ा करणाऱया खतरनाक जोडगोळीला कॅम्प पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे आता चोऱया, घरफोडय़ा कमी होणार अशी अटकळ होती. मात्र चोऱया सुरूच आहेत.
शिवबसवनगर येथे सव्वातीन लाखांची घरफोडी
शिवबसवनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे सव्वातीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविले आहेत. सोमवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
शिवबसवनगर सेक्टर क्रमांक 3 मधील शिवकुमार चंद्रशेखर मेस्त्राr यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी रात्री शिवकुमार व त्यांचे कुटुंबिय देवदर्शनासाठी शिर्डीला गेले होते. सोमवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता ते बेळगावला परतले. त्यावेळी त्यांच्या घरचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. बेडरुममधील तिजोरीमधील 9 तोळय़ांहून अधिक दागिने चोरटय़ांनी पळविल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.