कोकरुड वार्ताहर
आरळा (ता.शिराळा) येथील शाळकरी मुलगा राजवर्धन शंकर आतकीरे (वय 12) याचा कालव्यात पडून मृत्यु झाला. ही घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली असून याबाबत चा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरळा येथील राजवर्धन आतकीरे हा दत्त्तसेवा विद्यालय तुरुकवाडी येथे सहावीच्या वर्गात शिकत होता.शाळेस रविवार सुट्टी असल्याने तो आरळा गावच्या वरील बाजूस असणाऱ्या वारणा डाव्या कालव्या जवळील कुस्ती मैदानात सकाळी खेळायला गेला होता.खेळत असताना अचानक त्याचा तोल जाऊन कालव्यात पडून बुडून मृत्यु झाला. याबाबतची फिर्याद फैयाज शामशुद्दीन डांगे यांनी कोकरुड पोलिसात दिली असून पोलीस नाईक कारंजकर अधिक तपास करत आहेत.