नवी दिल्ली
सरकार इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मधील पाच टक्क्यांपर्यंतचा हिस्सा विकणार आहे. भागभांडवल ऑफर फॉर सेलद्वारे किमान 680 रुपये प्रति शेअर या किमतीने विकले जाणार असल्याची माहिती आहे.
ओएफएसअंतर्गत 2 कोटी शेअर्स किंवा 2.5 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. आणखी पाच टक्क्यांपर्यंत हिस्सा वाढवता येऊ शकतो. आयआरसीटीसीचे चार कोटी शेअर्स किमान 680 रुपये प्रति शेअर या दराने विकल्यास सरकारी तिजोरीत सुमारे 2,700 कोटी जमा होणार असल्याचा अंदाज आहे.