प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना आनंदाची बातमी दिली असून त्यांच्या मासिक मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा आदेश बजावला आहे. आतापर्यंत राज्य सरकारकडून ग्राम पंचायत अध्यक्षांना 3 हजार रुपये, उपाध्यक्षांना 2 हजार रुपये तर सदस्यांना 1 हजार रुपये मासिक मानधन दिले जात होते. परंतु आता अध्यक्षांसाठी 6 हजार रुपये, उपाध्यक्षांसाठी 4 हजार रुपये तर सदस्यांसाठी 2 हजार रुपये मानधन निश्चित करण्याचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. ग्राम विकास आणि पंचायत राज खात्याचे सरकारचे कार्यदर्शी एम. एस. बानोळ्ळी यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहेत.