Huge success of Danoli High School
दिनांक २२ व २३ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा छत्रपती शाहू क्रीडा संकुलन सातारा येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत कै.बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय,दाणोली या प्रशाळेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले . त्यात मुलामधून अमोल धोंडी पाटील याने गोल्ड तर विक्रांत कृष्णा कासले याने सिल्वर पदक मिळवून अनुक्रमे प्रथम आणि दुसरा येण्याचा मान मिळविला.
तसेच मुली मधून कुमारी साक्षी संतोष लांबर हिने गोल्ड तर निर्मला पाटील ,सरिता पाटील आणि आर्या गावडे यांनी ब्राँझ पदक मिळवले.
तसेच अमोल पाटील व साक्षी लांबर या दोघांची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आर.जी.पाटील यांचे संस्थेचे अध्यक्ष झिला पाटयेकर , मुख्याद्यापक जयवंत रामू पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी