बेळगाव – हासन येथे गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या मिक्सर बॉम्ब ब्लास्ट प्रकरण अखेर आज उघडकीस आले आहे.या प्रकरणी आरोपी अनूपकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ४१ व्या वर्षी आपल्या पतीला घटस्फोट दिलेल्या महिलेने अनूपकुमारच्या प्रेमाला नकार दिल्याने महिलेला जिवे मारण्याचा उद्धेशाने हे कृत्य केल्याचे त्याने मान्य केले आहे.
ही महिला लग्नासाठी मॅट्रिमोनीमध्ये वर अन्वेषण करीत असताना अनूपकुमारने प्रस्ताव ठेवला होता. याला पहिले संमती दर्शवून त्याच्या बरोबर काही वेळ घालवून लाखो रुपयांची मागणी या महिलेने केली असून नंतर लग्नाला नकार दिल्याने अनूपकुमारने ही भूमिका घेतल्याची माहिती हासन एसपी हरिराम शंकर यांनी दिली आहे . सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे .
Trending
- विश्वजित यांनी केले तनुजाचे कन्यादान
- म. ए. समितीच्या कार्यकर्त्याच्या घरावर भ्याड हल्ला
- पाच वर्षात मंडलिकांना बिंदू चौकात पाहिलेय का?- मालोजीराजे
- मानवी हाडे अन् कवटी; काय होणार शेवटी?
- शहरात रविवारी सर्वत्र वाहतूक कोंडी
- मतदान केंद्रावर ध्वजारोहण करण्याची सूचना
- भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले चिंताजनक
- बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मीच आहे