दापोलीचा पारा 10 अंश सेल्सिअसवर स्थिरावला
मौजेदापोली/ वार्ताहर
सध्या थंडीने दापोलीकरांना गारठवले आहे. 10.2 अंश सेल्सिअसनंतर दापोलीच्या पाऱयात पुन्हा घसरण होऊन तो 10 अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. जिह्यामध्ये 11 ते 15 जानेवारीदरम्यान हवामान कोरडे राहून कमाल आणि किमान तापमानात अनुक्रमे 2 ते 3 अंश सेल्सिअसइतकी घट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने कमी तापमानाचा पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भाजीपाला पिके, रोपवाटिका तसेच बागायती पिकांना संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावे, जेणेकरून जमीन उबदार राहण्यास मदत होईल. रात्रीच्या वेळेस उष्णतेसाठी कोंबडय़ांच्या शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब लावावेत. तसेच थंडीपासून संरक्षणासाठी भिंतीच्या जाळ्य़ांना गोणपाटाचे पडदे लावावेत. शेळ्य़ा, करडाचे थंडीपासून संरक्षणासाठी रात्री उष्णतेसाठी विजेचे बल्ब लावावेत. शेततळ्य़ातील/ तलावातील मत्स्यशेतीमध्ये सकाळी आणि रात्री उशिरा देण्यात येणारे खाद्याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी द्यावे. खाद्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ‘खाद्य चेक ट्रे’चा वापर करण्याचा सल्ला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून देण्यात आला आहे.