ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Santokh Singh Chaudhary passed away पंजाब जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाले. ‘भारत जोडो’ यात्रे’दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेत संतोख सिंह सहभागी झाले होते. यात्रेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीनं फगवाडा येथील विर्क रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सिंह यांच्या निधनाची माहिती मिळताच ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करत राहुल गांधी यांनी रुग्णालयात धाव घेतली.