नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 28 जानेवारीला तेलंगणाचा दौरा करणार आहेत. या दौऱयात ते भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱयांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते राज्यातील मुख्य कार्यकर्त्यांना भेटून निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तेलंगणामध्ये चालू वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी वेगवेगळय़ा राज्यांमध्ये जाऊन पक्षसंघटना बळकट करण्यासाठी कंबर कसली आहे. अमित शहा यांनी शुक्रवारी जम्मू काश्मीरला भेट देत पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांची बैठकही घेतली होती.