पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय
बेळगाव : कुंदरगी पंपहाऊसजवळ जलवाहिनीला मोठे भगदाड पडून पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय सुरू झाला आहे. एल अॅण्ड टी कंपनीने तातडीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तथापि, हिडकलहून होणाऱ्या मुख्य पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होणार आहे. उद्या आणि परवा पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होणार असून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर लगेचच पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीने केले आहे.
उद्या-परवा पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय दक्षिण भागातील मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, उत्तर भागातील सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर, एमएम वसाहत, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची, पॅन्टोन्मेंट परिसर, हिंडाल्को कारखाना, केएआयबीडी, औद्योगिक वसाहत, एन-ऊट व्हिलेज टॅपिंग, डिफेन्स कॉलनी, सैनिकनगर, केएलई ऊग्णालय आणि बिम्स ऊग्णालय भागात पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार आहे.