वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग तसेच हॉकी इंडियाचे अॅथलिट सदस्य जॉयदीप कौर यांचे हॉकी इंडियातर्फे अभिनंदन करण्यात आले. कोरियामध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई हॉकी फेडरेशनच्या बैठकीमध्ये भोलनाथ सिंग यांची उपाध्यक्षपदी तर जॉयदीप कौर यांची अॅथलिट सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सलिमा टेटेचा उदयोन्मुख हॉकीपटू म्हणून गौरव करण्यात आला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्या हस्ते भोलानाथ सिंग, जॉयदीप कौर आणि बी. बिगन सॉय यांचा खास गौरव करण्यात आला. बिगेन सॉय यांची आशियाई हॉकी फेडरेशनच्या महिलांच्या सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.