वृत्तसंस्था/ इस्टोरिल (पोर्तुगाल)
एटीपी टूरवरील येथे सुरू झालेल्या इस्टोरिल खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना अमेरिकेच्या शेल्टॉनचे आव्हान संपुष्टात आणले. गुरुवारी झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात थिएमने शेल्टॉनचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत थिएमने सलामीच्या सामन्यात आपल्याच देशाच्या ऑफनेरचा पराभव केला होता. 2023 च्या टेनिस हंगामात थिएमने पहिल्याच स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. स्पेनच्या मिरालेसने द्वितीय मानांकित हुरकेजचा 6-7 (5-7), 6-4, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.