कागवाड : राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने यंदा प्रथमच जाहीर केलेल्या नव्या आदेशानुसार 80 वर्षाच्या वरील वृद्ध व अपंगांचे मतदान घरोघरी जाऊन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कागवाड मतदारसंघातील 419 जणांची मतदान प्रक्रिया आठ टीमद्वारे पूर्ण करण्यात आली.
शनिवार व रविवारी कागवाड निवडणूक निर्णय अधिकारी जे के हरीश, उपनिवडणूक अधिकारी व कागवाडचे तहसीलदार एम. एन. बळीगार यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या आठ टीम बनवण्यात आल्या असून मतदारसंघातील 80 वर्षांवरील महिला 236 व पुरुष 129 तर अपंग मध्ये पुरुष 36 व महिला 18 असे 419 जणांचे मतदान गुप्तता पाळून पूर्ण करण्यात आले, अशी माहिती उपनिवडणूक अधिकारी एम. एन. बडी गार यांनी दिला आहे.
यावेळी निवडणूक सेक्टर अधिकारी एस.बी पाटील, पी आर ओ एस के लमाणी, तलाठी एम एस कणकणवर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.