15-0 ने दणदणीत विजय; निवडणुक केंद्राबाहेर जल्लोष
सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद कर्मचारी अर्थिक सहकारी सहाय्य संस्थेच्या निवडणूकीत अष्टविनायक पॅनेलचा धुव्वा करत वरदविनायक पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. 15 च्या 15 जागा जिंकत एकहाती सत्ता खेचून आणण्यात किंगमेकर दिनकर चव्हाण, अमोल पवार यांच्या प्रयत्नांना यश आले. निकाल हाती येताच विजयी झालेल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत निवडणूक केंद्राबाहेर जल्लोष केला.
दरम्यान, 15 जागांसाठी 39 जण निवडणूकीच्या रिंगणात होते. 625 मतदारांपैकी 585 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिकच्या निवडणूकीमध्ये चुरशीने सकाळपासून दुपारपर्यत मतदान झाले. सकाळी रांगा लागल्या होत्या. दुपारी 4 वाजेपर्यत 625 मतदारांपैकी 585 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. तेथून पुढे मतमोजणीस प्रारंभ झाला. ही प्रक्रिया शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर पार पडली. मतदानाचा निकाल सायंकाळी सहा वाजता लागताच जिल्हा परिषदेच्या