संशोधनाचा निष्कर्ष
प्रकृतीवरून करण्यात आलेल्या अध्ययनात किनारी भागात राहणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे आढळून आले आहे. किनाऱ्यानंजीक राहण्यासाठी शतकांपासून प्रोत्साहित केले जात होते, परंतु 20 च्या शतकात किनाऱ्यांनजीक राहण्यापासून लक्ष हटल्याचे अध्ययन अहवालात म्हटले गेले आहे.
निसर्गाच्या जितके जवळ रहाल तितकेच आरोग्यदायी जगाल असे म्हटले जाते. निसर्गाच्या सान्निध्यात शांतता आणि रिलॅक्स होण्यासाठी लोक वास्तव्य करू पाहत असतात. यात समुद्रकिनाऱ्यांनजीक वेळ घालविणे देखील सामील आहे. समुद्राचे दृश्य, शांततेची अनुभूती घडविणाऱ्या लाटांचा आवाज अन् खाऱ्या वाऱ्यांनी वैज्ञानिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. समुद्र किनाऱ्यानजीक राहणे किंवा काही वेळ घालविणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते असे नव्या अध्ययनात आढळून आले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ वियानाच्या एन्व्हॉयर्नमेंटल सायकोलॉजी ग्रूपच्या सँड्रा जेइगर यांच्या नेतृत्वात झालेल्या नव्या अध्ययनात किनारी वातावरणाचा प्रकृतीवरील प्रभाव पडताळून पाहिला गेला. यात समुद्र किनाऱ्यानजीक राहण्याचा उत्तम आरोग्याशी संबंध असल्याचे आढळून आले. तसेच कुठलाही देश किंवा व्यक्तीच्या उत्पन्नाशी याचे देणेघेणे नसल्याचे अध्ययनात म्हटले गेले आहे.
महासागरांच्या आसपासची धारणा उत्तम आरोग्याला पोषित करते. हा विचार 1660 च्या आसपास देखील प्रचलित होता. तेव्हा इंग्रज फिजिशियननी सागरी स्नान आणि किनाऱ्यांवर सैर उत्तम आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे म्हटले होते. तसेच लोकांना याकरता प्रोत्साहित करण्यावर भर दिला होता. 19 व्या शतकाच्या मध्यास युरोपच्या धनाढ्यांदरम्यान सागरी हवेत श्वास घेण्याची कृती उपचार म्हणून अवलंबिली जात होती. परंतु 20 व्या शतकात यापासून लोकांचे लक्ष हटू लागले. आता वैद्यकीय शास्त्राने पुन्हा यावर लक्ष देण्यास सुरुवात केली.
संशोधकांनी युरोपीय महासंघाकडून निधीप्राप्त होराइजन 2020 च्या सीज, ओशन्स अँड पब्लिक हेल्थ इन युरोप नावाच्या प्रकल्पांतर्गत हे अध्ययन केले आहे. यात व्हिएन्ना, एक्सेटर, बर्मिंगहॅम, सीस्केप बेल्जियम इत्यादी विद्यापीठांच्या तज्ञांच्या पथकाने युरोपीय देश आणि ऑस्ट्रेलियाच्या 12 हजारांहून अधिक जणांना सर्वेक्षणात सामील पेले आणि त्यांच्या वैयक्तिक आरोग्य आणि सागराशी निगडित हालचालींची माहिती मागितली होती.
अध्ययनाचे निष्कर्ष कम्युनिकेशन्स अर्थ अँड एनव्हॉयर्नमेंटमध्ये प्रकाशित झाले आहेत. सर्व देशांमध्ये स्पष्ट आणि एकच धारणा असल्याचा निष्कर्ष यातून निघाला आहे. समुद्रानजीक राहणाऱ्या सर्व जणांना लाभ झाला होता आणि याचा त्यांच्या राहणीमानाशी कुठलाच संबंध नव्हता. किनाऱ्यानंजीक राहणाऱ्यांच्या प्रकृतीवर सागरी वातावरणाचा चांगला प्रभाव पडत असल्याचे संशोधकांना पडताळणीत आढळून आले आहे.