रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीमुळे वेळापत्रकात बदल
प्रतिनिधी/ बेळगाव
उगार खुर्द ते विजयनगर यादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने मिरज-बेळगाव मार्गावर धावणाऱ्या काही एक्स्प्रेस रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. हुबळी-मिरज-हुबळी एक्स्प्रेस दि. 4 ते 9 जून दरम्यान, मिरज-हुबळी एक्स्प्रेस दि. 5 ते 11 जून दरम्यान तर कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस दि. 4 ते 11 जून दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस दि. 4 ते 8 जून दरम्यान, बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस दि. 5 ते 9 जून दरम्यान कोल्हापूर ते बेळगाव दरम्यान रद्द करण्यात आली असल्याने बेळगावमधून धावणार आहे. मिरज-बेंगळूर राणी चन्नम्मा एक्स्प्रेस दि. 5, 6 व 9 जून दरम्यान दोन तास उशिराने धावणार आहे. मिरज-बेंगळूर चन्नम्मा एक्स्प्रेस दि. 4, 7 व 8 जून दरम्यान अर्धा तास उशिराने धावणार आहे. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस दि. 5 जून रोजी 40 मिनिटे उशिराने तर पंढरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस दि. 9 जून रोजी एक तास उशिराने धावणार आहे. प्रवाशांनी या वेळापत्रकानुसार प्रवास करावा, असे आवाहन नैऋत्य रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहे.