वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लैंगिक शोषणाच्या आरोपांनी घेरलेले भारतीय कुस्ती महासंघाचे (आयडब्ल्यूएफ) अध्यक्ष माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्ली पोलिसांना या प्रकरणात चार साक्षीदार सापडले असून त्यांनी ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांना पुष्टी दिली आहे. यामध्ये एक ऑलिम्पियन, कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट, इंटरनॅशनल रेफ्री आणि राज्यस्तरीय प्रशिक्षक यांचा समावेश आहे. या प्रकरणातील 125 साक्षीदारांमध्ये हे सर्वजण आहेत. दिल्ली पोलीस हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये याचा तपास करत आहेत.