अक्षय कुमार मुख्य भूमिकेत
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आता निमरत कौर अन् सारा अली खान या अभिनेत्रींसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. सारा आणि निमरत या अभिनेत्री आता दिनेश विजानचा आगामी चित्रपट ‘स्काफ फोर्स’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार आहेत. एका एक पीरियड एरियम ड्रामा असून यात अक्षय वायुदल वैमानिकाच्या भूमिकेत आहे. तर सारा अन् निमरतच्या भूमिकेबद्दल गुप्तता बाळगली जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू केले जाणार आहे.
अक्षयने यापूर्वी निमरत तसेच सारा या दोघींसोबत काम केले आहे. 2016 मध्ये अक्षय अन् निमरत हे ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात दिसून आले होते. तर सारा अली खानने 2021 मध्ये ‘अतरंगी रे’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनय केला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष देखील होता.
सारा अलीखानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर सारा पुढील काळात अनुराग बसू याच्या ‘मेट्रो इन दिनों’ चित्रपटात आदित्य रॉय कपूरसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर अन् नीना गुप्ता देखील मुख्य भूमिकेत आहेत. तर निमरत कौरची वेबसीरिज स्कूल ऑफ लाइज’ अलिकडेच प्रदर्शित झाली आहे. यातील तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.