प्रत्येक प्राणी जन्मला येतो तेव्हा त्याच्या शरीरावर विशिष्ट खुणा किंवा चिन्हे असतात, याची आपल्याला माहिती आहे. या प्राण्यांमध्ये अर्थातच मनुष्यप्राण्याचाही समावेश आहेच. या नैसर्गिक चिन्हांपैकी काही चिन्हांना ‘शुभ’ मानले जाते. अशी चिन्हे अंगावर घेऊन जन्माला आलेल्यांना मग मोठी प्रसिद्धी मिळते.
सध्या सोशल मिडियावर एका श्वानाची बरीच चर्चा आहे. या श्वानाच्या मालकीणीनेच त्याचा व्हिडीओ टाकला आहे. या श्वानाच्या गळ्याखाली त्याचीच प्रतिमा वाटावी असे श्वानाचे चित्र दिसून येते. मात्र, हे नंतर काढण्यात आलेले चित्र नसून ते या श्वानाच्या जन्मापासून त्याच्या अंगावर आहे. म्हणजेच हा श्वान त्याची स्वत:ची प्रतिमा अंगावर चितारलेल्या अवस्थेत जन्माला आला आहे. अशी घटना दुर्मिळच म्हणावी लागेल. यामुळे या श्वानाची मोठी प्रसिद्धी होत आहे.
हा श्वान जन्मला तेव्हा त्याच्या मालकीणीलाही ही बाब माहीत नव्हती. नंतर तो मोठा होऊ लागला तेव्हा त्याच्या छातीवरची त्याचीच प्रतिमाही अधिक ठसठशीत होऊ लागली. त्यामुळे ती स्पष्ट दिसू लागली. तेव्हा त्याच्या मालकिणीला आश्चर्य वाटले आणि तिने नंतर या श्वानाचे छायाचित्र आणि माहिती सोशल मिडियावर पोस्ट केली. ही प्रतिमा गोंदविल्याप्रमाणे (टॅटू केल्याप्रमाणे) दिसते. हा श्वान जसा दिसतो, बरीचशी तशीच ही प्रतिमाही दिसून येते. अर्थातच त्यामुळे या श्वानाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.