सोलापूर प्रतिनिधी
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने पुणे ते हरंगुळ दरम्यान विशेष गाडी १० ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला असून, या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
गाडी क्रमांक ०१४८७ पुणे हरंगुळ एक्सप्रेस ही पुण्याहून ०६.१० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता हरंगुळला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४८८- हरंगुळ पुणे एक्सप्रेस ही हरंगुळ वरून दुपारी ३ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीस पुणे, हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, केम, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन आणि धाराशिव (उस्मानाबाद), हरंगुळ. येथे थांबे असणार आहेत. या गाडीस एकुण १५ डब्बे असून, १ एसी फर्स्ट क्लास, १ एसी २ टायर, ४ एसी ३ टायर, ५ स्लीपर क्लास, २ जनरल सेकंड क्लाससह २ गार्ड ब्रेक व्हॅन/जनरेटर कार असणार आहे. प्रवासासाठी बुकिंग ८ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.