वृत्तसंस्था/ बेंगळूर
आगामी प्रिमियर बॅडमिंटन लिग स्पर्धेचा (पीबीएल) शेवटचा टप्पा यापूर्वी बेंगळूरमध्ये खेळविला जाणार होता. पण या टप्प्यातील सामने खेळविण्यास बेंगळूरने आपली असमर्थता दाखविल्याने आता हा शेवटचा टप्पा हैद्राबादमध्ये खेळविला जाईल.
2020 च्या प्रिमियर बॅडमिंटन लिग स्पर्धेत 24 लढती आयोजित केल्या असून त्या चार विविध शहरांमध्ये 21 दिवसात खेळविल्या जाणार आहेत. सदर स्पर्धा 20 जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील हैद्राबादचा शेवटचा टप्पा 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
हैद्राबादमध्ये आता या स्पर्धेतील तिसरा आणि चौथा टप्पा होणार आहे. तिसरा टप्पा 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान खेळविला जाईल. उपांत्य आणि अंतिम सामन्यांचे यजमानपद हैद्राबाद भूषवित आहे. या स्पर्धेतील पहिला टप्पा चेन्नईत 20 ते 24 जानेवारी तसेच दुसरा टप्पा लखनौत 25 ते 28 जानेवारी दरम्यान होईल.