प्रतिनिधी/ पलूस
पलुस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथील चितळे जीनस एबीएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अनुवंशिक कृत्रिम रेतन प्रकल्पास केंद्र सरकारच्या पथकाने भेट दिली. दरम्यान जातिवंत पैदाशीचे कार्य करणाऱया उद्योजकांना केंद्रसरकार सहाय्य करणार असल्याची माहिती भारत सरकारचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सचिव अतुल चतुर्वेदी यांनी दिली.
केंद्रपुरस्कृत योजना आणि कार्यक्रमांशी संबंधित अंमलबजावणीबाबत माहिती घेण्यासाठी आलेल्या केंद्रिय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिवासोबत सहसचिव मिहिर कुमार सिंग, उपमन्यू बसू, उच्च अधिकाऱयांसह प्रधान सचिव (पदुम) अनुपकुमार आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे उपस्थित होते. राज्यामधील दुग्ध उत्पादन वाढीसाठी जास्तीत जास्त कालवडी व पारडयांची पैदास होण्यासाठी आवश्यक लिंगवर्गीकृत वीर्यमात्रा उत्पादन तंत्रज्ञानाचा क्षेत्रीय स्तरावर होणाऱया वापराचा आढावा घेण्यात आला. या तंत्रज्ञानाचा वापर करून वीय उत्पादन करणाऱया प्रयोगशाळा उभारण्यासाठी भारत सकार निधी उपब्ध करून देण्याच्या विचारधीन असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. औरंगाबाद येथे जिनस एबीएस इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने लिंगवर्गीकृत प्रयोगशाळा स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली असून चितळे डेअरी आणि भारतीय ऍग्रो इंडस्ट्रीज फाऊडेशन (बायफ) या अशासकीय संस्थांच्या पातळीवरून नमूद तंत्रज्ञानाच्या वापराबाबत परिणामांचे महत्वाचे पाऊल केंद्र शासनाने उचलले आहे. चितळे डेअरी यांनी मे. जिनस एबीएस इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने भिलवडी (जि.सांगली) येथे आणि भारतीय ऍग्री इंडस्ट्रीज फाऊंडेशन यांनी एसटी जेनेटिक्स यांच्या सहकार्याने उरळी कांचन येथे लिंगनिदान रेतमात्रा उत्पादन प्रयोगशाळा उभा केल्या आहेत. पथकाने चितळे डेअरीच्या दुग्ध प्रक्रिया प्रकल्प तसेच दुग्ध शाळेला भेट देऊन सविस्तर चर्चा केली.
केंद्रीय पथकाने प्रयोगशाळोत भ्रुणसंयोग आणि भ्रुणप्रत्यारोपण या संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेवून उत्पादित भ्रुणांचा आणि या पध्दतीचा अंतिमतः शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टयाच्या अनुषंगाने होणाऱया उपयोगाची माहिती घेत उद्योग समुहाचे कौतुक केले. देशी गाय, पशुधन, शेळया, मेंढया, वराह, आणि कुक्कुट यांच्या जातिवंत पैदाशीचे कार्य करणाऱया पैदासकरणाऱया संस्था व उद्योजकांना राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनांतून सहाय्य करण्याचा केंद्राचा विचार आहे. उच्च अनुवंशिकतेचे वळू, भ्रुण अथवा रेतन मात्रांचा समावेश असणारे गीर गोवंशाचे अत्युच्च दर्जाचे जर्मप्लाजम ब्राझीलहून आयात करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. राज्यातील शेतकरी व पशुउत्पादकांनी राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सचिवांनी केले. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱया राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमात लाळखुरकत आणि संसर्गजन्य गर्भपात या रोगांचे नियंत्रण अंतर्गत लसीकरणाचा कार्यक्रम मार्च 2020 पासून राबवण्यात येणार असून याचा लाभ शेतकऱयांनी घ्यावा असे ही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी चितळे डेअरीचे संचालक श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, अनंत चितळे, गिरीष चितळे आदी उपस्थित होते.