प्रतिनिधी/ दहिवडी
दिव्यांगानी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा,तसेच लहान मोठय़ा प्रमाणात व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नती करावी असे आवाहन सभापती कविता जगदाळे यांनी केले.
माण पंचायत समितीच्या बचत भवन येथे दिव्यांग उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण उदघाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, तानाजी काटकर, गटविकास अधिकारी गोरखनाथ शेलार, सहाययक गटविकास अधिकारी भरत चौगुले,दिव्यांग महासंधाचे अध्यक्ष संजय जगताप, अशोक भोईर, अनुलोमचे समन्वयक दादासाहेब जगदाळे, रुपेश कदम, विस्तार अधिकारी बी. बी.भोसले आदी उपस्थित होते.
सभापती कविता जगदाळे म्हणाल्या, दिव्यांगांना समाजात सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे तसेच एखादा अवयवं नसेल तरी आपण कमी नाही असे समजूनदिव्यांगानी कलेचा, बुद्धीचा उपयोग करावा. अनेक दिव्यांग बुद्धी व कलेच्या जोरावर विविध क्षेत्रात काम करताना पाहायला मिळते.
गटविकास अधिकारी शेलार म्हणाले, निसर्गाने दिव्यांगांना काही तरी कमी दिलेले असते मात्र त्यांनी खचून जाऊ नये त्यावर त्यांनी मात करावी आलेले अपंगत्व बाजूला ठेवून सर्वसामान्य जीवनमान जगणे आवश्यक आहे.
जगताप म्हणाले, आमच्या हक्काच्या योजना मिळाव्यात अन मिळवून दिल्या जातात. दिव्यांगांना सन्मानाने पेन्शन योजना, नगरपंचायतीच्यावतीने पाच टक्के निधी देण्यात येत आहे हे मिळविण्याचे काम संघटनेने केले. सूत्रसंचालन वीरधवल शिंदे यांनी केले.